Skip to content
Blur Document

चेकवरची अकाउंटची माहिती लपवा

चेकचा फोटो पाठवण्याआधी अकाउंट नंबर, MICR लाइन, IFSC आणि सही लपवा. तुमचा चेक तुमच्या डिव्हाइसबाहेर जात नाही.

Drop files here

or paste a screenshot with Ctrl+V

PNG, JPG, WebP PDF up to 50 pagesMax 25 MB eachUp to 20 files at once

Processed on your device. Your file is never uploaded.Prove it

Pick a document to hide its fields in one click.
Detected items are covered right away. You can still uncover any of them.
Runs on your device. Downloads a 19 MB model once.
ID photos, selfies, people in screenshots. Runs on your device.
Balanced
Recommended. Catches most things without much noise.

Save as a preset

Keeps the document type, the fields you ticked, the redaction style and the watermark. Saved in this browser only.

चेकवरची माहिती कशी लपवावी

  1. वर चेकचा फोटो, स्कॅन किंवा PDF टाका. फोटो थोडा तिरका असला तरी चालेल.
  2. अकाउंट नंबर आणि सगळ्यात खालची MICR लाइन आपोआप झाकली जाते.
  3. IFSC, Payee चे नाव, रक्कम, मोबाइल नंबर किंवा सही लपवायची असेल तर त्यावर टिक करा.
  4. डाउनलोड करा. डाउनलोडपूर्वी फाइल पुन्हा तपासली जाते, काही वाचण्याजोगे उरले नाही ना हे पाहण्यासाठी.

कॅन्सल्ड चेक पाठवताना काय लपवावे?

नवीन नोकरीत पगारासाठी, किंवा EMI, विमा आणि गुंतवणुकीसाठी बँक खाते जोडताना, खाते तुमचेच आहे हे दाखवण्यासाठी कॅन्सल्ड चेक मागितला जातो. अशा वेळी समोरच्याला सहसा अकाउंट नंबर, IFSC आणि नाव लागते. तेव्हा अकाउंट नंबर अनटिक करून दिसू द्या, आणि सही, मोबाइल नंबर यांसारखी बाकी माहिती लपवा.

चेक दिला आहे एवढेच दाखवण्यासाठी फोटो पाठवत असाल, तर अकाउंट नंबर आणि MICR लाइन लपवणेच योग्य. शंका असेल तर त्यांना चेकवरची नेमकी कोणती माहिती हवी आहे ते विचारा.

MICR लाइन म्हणजे काय?

चेकच्या अगदी खाली खास (मॅग्नेटिक) शाईत छापलेल्या अंकांच्या ओळीला MICR लाइन म्हणतात. त्यात चेक नंबर, बँक आणि शाखेचा कोड, आणि खात्याशी संबंधित कोड असतो. वरचा अकाउंट नंबर झाकला पण ही ओळ उघडी ठेवली, तर माहिती तरीही दिसू शकते.

सही कशी लपवावी

Signature वर टिक केल्यावर "Please sign above" किंवा "Authorised Signatory" सारख्या छापील लेबलजवळची सही झाकली जाते. सही सापडली नाही, तर तिच्यावर हाताने बॉक्स काढा.

तुमची फाइल तुमच्याकडेच राहते

फाइल तुमच्या ब्राउझरमध्येच उघडली, वाचली आणि बदलली जाते. ती कुठेही अपलोड होत नाही, त्यामुळे कोणीही (आम्हीसुद्धा) ती पाहू शकत नाही. साइन-अप नाही, आणि हे पूर्णपणे मोफत आहे.

प्रश्नोत्तरे

कॅन्सल्ड चेकवरचा अकाउंट नंबर लपवावा का?

समोरच्याला त्याची गरज नसेल तरच. खाते पडताळण्यासाठी पाठवलेल्या चेकवर नंबर सहसा दिसायला हवा; अशा वेळी सही आणि इतर अनावश्यक माहिती लपवणे पुरेसे आहे.

हाताने लिहिलेले नाव किंवा रक्कम आपोआप झाकली जाते का?

नाही. टूल अंक आणि इंग्रजीत छापलेला मजकूर वाचते, हस्ताक्षर आणि मराठी मजकूर नाही. हाताने लिहिलेली रक्कम किंवा नाव लपवायचे असेल, तर त्यावर बॉक्स काढा.

टूलची बटणे इंग्रजीत का आहेत?

सध्या टूलची बटणे इंग्रजीत आहेत. वरच्या पायऱ्या त्याच क्रमाने दिल्या आहेत ज्या क्रमाने तुम्ही टूल वापराल.

This PDF is password-protected

e-Aadhaar PDFs use the first 4 letters of your name in CAPITALS followed by your year of birth (e.g. RAVI1991). Bank statements often use part of your name, date of birth or customer ID.

The password only unlocks the file in this tab. It isn't saved or sent anywhere, and the copy you download has no password.